अखेर मद्यविक्रीच्या दुकानांसमोरील शिक्षकांच्या नियुक्त्यांचा तो निर्णय रद्द
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
source:- सकाळ
मूर्तिजापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मद्यविक्रीच्या दुकानांसमोर समन्वयक अधिकारी म्हणून करण्यात आलेल्या महाविद्यालयीन व कनिष्ठ महाविद्यालयीन नियुक्त्यांमध्ये येथील तहसील प्रशासनाने आज बदल केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात प्रमाणाबाहेर वाढत आहे. या विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्याच्या उपायांमधील एक प्रभावी उपाय म्हणजे सोशल डिस्टंसिंग राखणे आणि मास्क वापरणे आहे. लॉकडाउनमधून मद्य विक्रीच्या दुकानांना वगळण्यात आल्यामुळे या दुकानांवर ग्राहकांची गर्दी उसळण्याची शक्यता बळावली. प्रत्यक्षात मद्यविक्रीस सुट मिळण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे काल या परिणामाचा प्रत्यय आला.
त्यामुळे या तालुक्यातील मद्यविक्रीच्या पाच दुकानांवर येथील गाडगे महाराज महाविद्यालयातील महाविद्यालयीन व कनिष्ठ महाविद्यालयीन नऊ शिक्षकांची एका आदेशान्वये काल तहसील प्रशासनाने समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. सोशल डिस्टंसिंग राखणे, शिस्त ठेवणे ही जबाबदारी उद्यापासून सम दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत त्यांच्यावर टाकण्यात आली होती.
मद्यविक्रीच्या दुकानांवरील नियुक्ती शिक्षकांसाठी अशोभनीय आहे. विद्यार्थी व पालकांची या दुकानांसमोरील रांगांमधील उपस्थिती त्यांच्यावर चौकीदारी करण्याचे काम देण्यात आलेल्या शिक्षकांसाठी मनस्ताप देणारी आहे, अशा सूचना प्राप्त झाल्यामुळे या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दुकानांसमोरील नियुक्त्या रद्द केल्या
मद्यविक्रीच्या दुकानांसमोर कोणाचीही नियुक्ती करू नका व तेथील परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी स्थानिक कर्मचाऱ्यांवर सोपवा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे संबंधित शिक्षकांच्या मद्यविक्रीच्या दुकानांसमोरील नियुक्त्या रद्द केल्या असून, त्यांना अन्यत्र नियुक्ती देण्यात येईल.
-प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर,

Comments
Post a Comment