सिरोंचा तालुक्याला पुराचा तडाका
तेलंगणातील धरणातून पाणी सोडल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. चार गावातील 330 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेले आहे.नद्यांच्या महापुरामुळे या तालुक्यात विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे.आज मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सिरोंचा तालुक्यातील सर्व शाळा, अंगणवाडी महाविद्यालय यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.