महाराष्ट्र दिनी शाळांमध्ये ध्वजारोहण नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
source:-सकाळ
सोलापूर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. यापूर्वी दिलेल्या पत्रकानुसार शाळांमध्ये एक मे या महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या महाराष्ट्रदिनी शाळांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्तचे ध्वजारोहण करण्यात येऊ नये, अशी सूचना राज्याच्या शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून शिक्षण अधिकाऱ्यांना दिली.
राज्यात कोरोनाच्या रोगाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस या रोगाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचा सोहळाही येत आहे.
त्यामुळे त्या सोहळ्याला गर्दी जमवून या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात आल्यानेच यापूर्वी चार लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्याच्या दिलेल्या सूचनाही रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत मुख्य सचिवांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून दिलेल्या सूचनांनुसार राज्यातील कोणत्याही प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे एक मे या महाराष्ट्र दिनी शाळांमध्ये होणारे ध्वजारोहण रद्द करण्यात आले आहे. सोलापूरच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांनीही याबाबत व्हाट्सअप च्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना तशाप्रकारे सूचना दिल्या आहेत.

Comments
Post a Comment