गडचिरोलीत पुढील वर्षी सुरु होणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय –पालकमंत्री विजय वडेट्टीवार
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
गडचिरोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज गडचिरोली येथे आढावा बैठक घेतली. राज्यस्तरावरील समिती व जिल्हा टीमबरोबर चर्चेनंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
भारतीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली यांच्या मानकानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरीता आवश्यक त्या सर्व बाबी उपलब्ध असून याकरीता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर डॉ. एस. एस. मोरे, प्राध्यापक डॉ. राजेंद्र सूरपाम, मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक अनिल रुडे, उपस्थित होते. गडचिरोली सारख्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असून यामध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये अशा सूचना उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी यावेळी दिल्या.
फेब्रुवारी महिन्यात डॉ. राजेंद्र सूरपाम यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे नविन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने निरीक्षण करण्यात आले होते. व त्याचा सकारात्मक प्रस्ताव माननीय संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना फेब्रुवारी २०२० ला पाठविण्यात आलेला होता. त्याअनुषंगाने त्याबाबतचा अहवाल आज, २१ एप्रिल २०२० रोजी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर डॉ. मोरे, प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर डॉ. राजेंद्र सूरपाम तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी काहीही अडचण सद्य:स्थितीत नाही. नवीन पदनिर्मिती करुन व प्रतिनियुक्तीने पदभरती करून गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय २०२१ पर्यंत सुरु होऊ शकते. त्याकरीता आवश्यक निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. तसेच याबाबत पाठपुरावा करुन कामात अडचण आल्यास कळविण्यात यावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत केले.
३२ एकर जागा उपलब्ध
जिल्हयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक २५ एकर जागेनुसार ३२ एकर जागा उपलब्ध असून त्यामध्ये काही अडचण नाही. बाहयरूग्ण सेवा, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग तसेच इतर विभागासह २ व्याख्यान कक्षांची आवश्यकता आहे. पैकी व्याख्यान कक्ष इमारतीचे बांधकाम करावे लागेल. खाटांची आवश्यकता ३०० असून सद्या ४०६ उपलब्धता आहे. विद्यार्थ्यांसाठी ६० क्षमतेचे वसतिगृह आवश्क असून तेही उपलब्ध आहे. महाविद्यालयासाठी एकूण शैक्षणिक कामाकरीता १०३ मनुष्यबळ आवश्यक असून त्याची पदनिर्मिती अथवा प्रतिनियुक्ती करावी लागणार आहे.

Comments
Post a Comment