सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता रोखीने मिळण्याबाबत निवेदन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आज दिनांक 27 एप्रिल 2020 ला परिभाषीत अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा थकबाकीचा दुसरा हप्ता 1जुलै 2020 ला* अदा करण्यात यावा याबाबत मा.संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चामोर्शी यांना निवेदन देण्यात आले.
शासन परिपत्रक,वित्त विभाग,दिनांक 30/05/2019 च्या शासन निर्णया प्रमाणे परिभाषीत अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जाने, 2016 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान हप्त्यात प्रती वर्षे एक हप्ता याप्रमाणे दरवर्षी 1जुलै ला रोखीने अदा करण्यात यावा असा शासनाने निर्णय घेतलेला होता.
त्या अनुषंगाने मा.गटशिक्षणाधिकारी मस्के साहेब पंचायत समिती चामोर्शी यांनी सदर फरक 1 जुलै 2020 ला मिळण्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यासाठी शिक्षण विभागातील लिपीत तावाडे मॅडम व इंगळे मॅडम यांना सूचना करून फरकेचा दुसरा हप्ता 1 जुलै 2020 ला देण्यात येईल असे आश्वासन मा.गटशिक्षणाधिकारी मस्के यांनी संघटनेच्या पदाधीकाऱ्यांना दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रविण पोटवार,सचिव सुजित दास,प्रमुख संघटक मदन आभारे,शिवराज हुलगुंडे,शिवाजी गर्जे,शिवाजी केंद्रे,शिवाजी वड्डे,सुरेश उसेंडी उपस्थित होते.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments
Post a Comment